About Sara Foundation

माहेरून विदर्भ कन्या म्हणून ओळख मूळ गाव चंद्रपूर , पदवी पर्यंत चे शिक्षण नागपूर विद्यापीठातून पूर्ण. १९८६ लग्नानंतर मुंबई
नागपूर येथे धरमपेठ महाविद्यालयात असताना पाच वर्षे ए बी व्ही पी चे (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) काम . पदवीधर होण्याच्या एक वर्ष आधीच म्हणजे १९८६ ला लग्न १९८७ ला पदवीधर . लग्नानंतर घरातील मंडळींना घरच्या महिलांनी सामाजिक कार्य करण्यासाठी बाहेर जाणे आवडत नसल्याने तेथेच कार्य थांबले. सामाजिक कार्याची आवड असल्याने २००४ पासून पुन्हा कामाला हळू हळू सुरुवात.
महिलांच्या , नागरिकांच्या सामाजिक समस्या तसेच सोसायटीच्या समस्या सोडविणे, त्यासाठी महापालिकेकडे व इतर शासकीय विभागाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देणे
जनसंपर्क वाढविण्यात आवड हळू हळू सामाजिक कार्यात सक्रिय होत असतानाच ,२२ एप्रिल २००६ ला घरातील घडलेली मोठी घटना….! त्यामुळे सर्व सामाजिक कार्याला पुन्हा पूर्णविराम आणि कोर्ट कचेरी आणि सरकारी कामात व्यस्त . ह्या कोर्टकचेरी तून सरकारी कामाची ओळख आणि काम करण्याची पद्धतमहाराष्ट्र शासनाची शासकीय यंत्रणा शिकण्यास मिळाली त्यातच आवड निर्माण झाली आणि आयुष्याला वेगळ्या दिशेने वळण मिळाले

२००६ ते २०१० पूर्ण ४ वर्षे घर व मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करत कोर्ट कचेरी च्या कामात व्यस्त.

२०११ पासून ठाण्यातील इतर साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक , धार्मिक संस्थांशी सलंग्न आणि त्यातूनच नव्याने कामाला पुन्हा सुरुवात . आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसात आपण नवीन काही शिकू शकतो ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊनच सारा फौंडेशन ची स्थापना २३ ऑक्टोबर २०१३ रोजी केली व महिलांना सोबत घेऊन कामाला जोमाने सुरुवात .
“कमी तिथे आम्ही “संस्थेच्या म्हणीचा पुरेपूर उपयोग करूनच “सारा फौंडेशन” च्या माध्यमातून मध्यम वर्गीयांपासून पासून ते उच्च स्तरातील महिलांना होणाऱ्या घरगुती त्रासातून बाहेर काढण्या साठी व महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी कायदातून लढाई ला सुरुवात आज संस्थेकडे महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या केसेस सुरु आहेत .

PARTNERS

आज सारा फौंडेशन च्या कामात माझ्या सोबत माझ्या सहकारी महिला व इतर कार्यकर्त्यांचे सहकार्य मला सतत मिळत असते सारा फौंडेशन हि संस्था उभी करण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य मला लाभले . सारा फाउंडेशन ही विविध प्रकारचे आरोग्य विषयक शिबिरे राबविते.
चार वर्षे ठाणे जिल्हा व मुंबई येथे काम केल्या नंतर २०१८ पासून सारा ने महाराष्ट्रात विविध प्रकारचे उपक्रम घेण्यास सुरुवात केलेले आहे .पोलीस मित्र म्हणून सारा महाराष्ट्र पोलिसांसाठी सुद्धा उपक्रम राबविण्यास पुढे असते. झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम सुद्धा सारा संस्था दरवर्षी घेत असते.
महाराष्ट्र शासनाला धरून चालणारी सारा , ही प्रत्येक उपक्रमात शासकीय अधिकाऱ्यांचा बोलावून सन्मानित करीत असते .

MISSION

Our efforts are a small contribution to help the poor and the needy. Fulfilling the rights of small children,is among

VISION

Sara been started with a great vision and genuine commitment to bringing positive,change for the betterment of society and its

OBJECTIVES

We function for a mission to encourage humankind and objects of social good. We are a voluntary,association of communities, and people work at the state level.

Our Objective

We address and express the needs, desires and interested of the community groups in front of the specified authorities.

Our Blog

फेब्रुवारी २०२१ - संभाजीनगरकर (औरंगाबाद) सदस्यांतर्फे सारंगी प्रवीण महाजन ह्यांचा सत्कार

मा. अनिलकुमार चांदोलीकर यांच्या हस्ते सारा फौंडेशन च्या अध्यक्षा श्रीमती सारंगी प्रवीण महाजन ह्यांचा संभाजीनगर नगर (औरंगाबाद) येथे फेब्रुवारी २०२१ रोजी सत्कार करण्यात आला.   (...)

0
STATES
0
PROJECTS
0
CHILDREN SCHOOLED
0
VILLAGES & SLUMS

Our Gallery

Get in Touch with the Us