माहेरून विदर्भ कन्या म्हणून ओळख मूळ गाव चंद्रपूर , पदवी पर्यंत चे शिक्षण नागपूर विद्यापीठातून पूर्ण. १९८६ लग्नानंतर मुंबई
नागपूर येथे धरमपेठ महाविद्यालयात असताना पाच वर्षे ए बी व्ही पी चे (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) काम . पदवीधर होण्याच्या एक वर्ष आधीच म्हणजे १९८६ ला लग्न १९८७ ला पदवीधर . लग्नानंतर घरातील मंडळींना घरच्या महिलांनी सामाजिक कार्य करण्यासाठी बाहेर जाणे आवडत नसल्याने तेथेच कार्य थांबले. सामाजिक कार्याची आवड असल्याने २००४ पासून पुन्हा कामाला हळू हळू सुरुवात.
महिलांच्या , नागरिकांच्या सामाजिक समस्या तसेच सोसायटीच्या समस्या सोडविणे, त्यासाठी महापालिकेकडे व इतर शासकीय विभागाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देणे
जनसंपर्क वाढविण्यात आवड हळू हळू सामाजिक कार्यात सक्रिय होत असतानाच ,२२ एप्रिल २००६ ला घरातील घडलेली मोठी घटना….! त्यामुळे सर्व सामाजिक कार्याला पुन्हा पूर्णविराम आणि कोर्ट कचेरी आणि सरकारी कामात व्यस्त . ह्या कोर्टकचेरी तून सरकारी कामाची ओळख आणि काम करण्याची पद्धतमहाराष्ट्र शासनाची शासकीय यंत्रणा शिकण्यास मिळाली त्यातच आवड निर्माण झाली आणि आयुष्याला वेगळ्या दिशेने वळण मिळाले
२००६ ते २०१० पूर्ण ४ वर्षे घर व मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करत कोर्ट कचेरी च्या कामात व्यस्त.
२०११ पासून ठाण्यातील इतर साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक , धार्मिक संस्थांशी सलंग्न आणि त्यातूनच नव्याने कामाला पुन्हा सुरुवात . आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसात आपण नवीन काही शिकू शकतो ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊनच सारा फौंडेशन ची स्थापना २३ ऑक्टोबर २०१३ रोजी केली व महिलांना सोबत घेऊन कामाला जोमाने सुरुवात .
“कमी तिथे आम्ही “संस्थेच्या म्हणीचा पुरेपूर उपयोग करूनच “सारा फौंडेशन” च्या माध्यमातून मध्यम वर्गीयांपासून पासून ते उच्च स्तरातील महिलांना होणाऱ्या घरगुती त्रासातून बाहेर काढण्या साठी व महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी कायदातून लढाई ला सुरुवात आज संस्थेकडे महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या केसेस सुरु आहेत . आबालवृद्धांच्या समस्या , शैक्षणिक समस्या तसेच सांकृतिक, ,नागरी समस्यां वर काम .
महाराष्ट्र निवडणूक आयोगा तर्फे मतदार नोंदणी तसेच प्रचार व प्रसाराचे काम. मतदान नोंदणी अभियान व प्रसार मोहीम , पदवीधर निवडणुका ,लोकसभा,विधानसभा निवडणुकान दरम्यान पूर्ण .लसीकरण मधून अपंग निराधार परितक्त्या महिला व पुरुष यांना सर्वे च्या माध्यमातून काम देऊन संस्थेने रोजगार दिला आज १३ महिला व ४ पुरुष लसीकरण मोहिमेतून रोजगार देतोय.
त्याचप्रमाणे सदनिका धारकांच्या स्वतःच्या हक्काच्या लढाई साठी कायद्यातून मदत करून देण्याची तयारी .
२०१५ रोजी महाराष्ट्र निवडणूक आयोगा तर्फे सी एस ओ राष्ट्रीय अवार्ड साठी नामनिर्देश झाले पहिल्या १० क्रमांकात सारा चा नंबर लागला ह्यातच संस्थेला समाधान आहे . २०१४ च्या निवणुकां दरम्यान १००० च्या वॉर यशस्वी नोंदणी सारा संस्थेने केलेली .
२०१६ जानेवारीच्या सुरुवातीपासून शनि शिंगणापूर येथील शनि देवताच्या चौथऱ्यामध्ये महिलांना प्रवेश मिळण्याच्या मागणीवर निषेध करण्या साठी सतत पाठपुरावा करून २६ जाने वारी रोजी शनि शिंगणापूरला १२२ महिला व पुरुषांना घेऊन जाणारी एकमेव सारा संस्थे ला यश आले आहे . समस्त हिंदुंच्या भावना दुखावणारा विषय घेऊन काही विकृत महिलांनी चौथऱ्या मध्ये प्रवेश करण्यासाठी येणार असे कळताच सारा फौंडेशन ने पुढाकार घेऊन त्याचा निषेध व्यक्त केला महिलांना चौथऱ्या मध्ये प्रवेश तर नाहीच पण शनि शिंगणापूरला सुद्धा येण्यापासून ह्या महिलांना अडविण्यात आले होते. शनि शिंगणापूर हा धार्मिक मुद्दा असून हिंदुच्या श्रद्धेला ठेच पोहोचेल असे कोणतेही पाउल सारा फौंडेशन ने उचलले नाही प्रशासन ,तसेच स्थानिक पंचक्रोशीतील महिला संघटना व शनि शिंगणापूर देवस्थानच्या कमिटी ला सारा फौंडेशन तर्फे सहकार्य दिल्या गेले संस्था समाजातल्या अश्या महिला ज्या विचित्र आणि विकृत विचारांच्या आहे अश्या महिलेच्या विचारांच्या विरोधात कायम उभी आहे . देव देवतांची विटंबना व नियमांचे उल्लंघन हे सारा संस्थेला कधीच मान्य नाही हिंदू धर्माच्या सोबत उभी राहणारी एकमेव संस्था म्हणून सारा ची ओळख आहे .
आज सारा फौंडेशन च्या कामात माझ्या सोबत माझ्या सहकारी महिला व इतर कार्यकर्त्यांचे सहकार्य मला सतत मिळत असते सारा फौंडेशन हि संस्था उभी करण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य मला लाभले . सारा फाउंडेशन ही विविध प्रकारचे आरोग्य विषयक शिबिरे राबविते.
चार वर्षे ठाणे जिल्हा व मुंबई येथे काम केल्या नंतर २०१८ पासून सारा ने महाराष्ट्रात विविध प्रकारचे उपक्रम घेण्यास सुरुवात केलेले आहे .पोलीस मित्र म्हणून सारा महाराष्ट्र पोलिसांसाठी सुद्धा उपक्रम राबविण्यास पुढे असते. झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम सुद्धा सारा संस्था दरवर्षी घेत असते.
महाराष्ट्र शासनाला धरून चालणारी सारा , ही प्रत्येक उपक्रमात शासकीय अधिकाऱ्यांचा बोलावून सन्मानित करीत असते .