
महाराष्ट्र शासनाने निवडणुकीच्या कामात हातभार लागावा म्हणून शासनाने संस्थेला मंत्रालय मुंबई येथे वारंवार मीटिंग ला बोलावून संस्थेवर विश्वास दाखविला त्या बद्दल महाराष्ट्र राज्य शासनाचे सारा संस्था कायम आभारी आहे.
२०१३ – २०१४ साली येणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा व लोकसभा निवडणुकां दरम्यान सारा संस्थे तर्फे मतदान नोंदणी अभियान प्रचार व प्रसार चे काम यशस्वी पणे पार पाडले संस्थे तर्फे ठाणे शहर येथे १००० च्या वर नोंदणी केल्या गेल्या. संस्थे तर्फे डिसेंबर २०१३ जानेवारी २०१४ ह्या दोन महिन्यात कॉलेजेस व सोसायट्यांमधून तीन दिवसाचे कॅम्प घेण्यात आलेले हा उपक्रम डिसेम्बर व जानेवारी महिन्यात पूर्ण करण्यात आला ह्या मध्ये कॉलेज मधील १८ ते २५ वयोगटातील मुलांची मतदार नोंदणी संस्थे तर्फे करण्यात आली होती ह्या मध्ये प्रत्येक कोलेज मध्ये तीन तीन दिवसाचे कम्प राबविण्यात आले ह्या नोंदणी मोहिमेतून तरुणांचा मतदार नोंदणी साठी उत्साह दिसून आला .संस्थेला कॉलेजेस मधून प्राध्यापक ,कर्मचाऱ्यांची मदत झाली तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची सुद्धा मदत झाली . एप्रिल २०१४ मध्ये लोकसभा निवडणुका ठाणे येथे २४ एप्रिल la झाल्या ह्या मध्ये संस्थे ने दिवसभर मतदानासाठी घर घरातून जाऊन जनतेला मतदान करण्या साठी बाहेर काढले तसेच अबल वृद्ध यांना स्वतःच्या खर्चाने मतदान केंद्रावर मतदानासाठी नेले .संस्थे तर्फे सर्व महिलांनी ठाणे येथील प्रत्येक बूथ वर जाऊन मतदानाचा आढावा घेतला .
ह्या मध्ये ठाण्यातील प्रत्येक कोलेज मध्ये तीन तीन दिवसाचे कम्प राबविण्यात आले विद्यार्थ्यांचा मतदार नोंदणी करून घेण्यास उत्साह दिसून आला.
जास्तीत जास्त मतदान व्हावे हाच संस्थेचा हेतू होता.
तसेच मतदानाच्या दिवशी सर्व मतदार यांना सारा संस्थेच्या सर्व महिलांनी घर घरात जाऊन मतदानासाठी बाहेर पडण्यास विनंती केली मतदान कोणत्याही पक्षाला द्या पण मतदानाला बाहेर पडा व एक जागरूक नागरिक म्हणून मतदान करा असे आव्हान करण्यात आले.व शंभर टक्के मतदान करण्याकडे जास्तीत जास्त भर देण्यात आला.
सर्व सारा संस्थेच्या महिलांना धन्यवाद !