महिला दिन ८ मार्च २०१४ “सेवाव्रती पुरस्कार”

महिला दिन ८ मार्च २०१४ सारा फौंडेशन तर्फे, वेगवेगळ्या वाटेने जाणाऱ्या व स्वतःचे कर्तुत्व आणि अस्तित्व सिद्ध करू पाहणाऱ्या तसेच प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवणाऱ्या आगळ्या वेगळ्या महिलांचा सन्मान महिला दिनाच्या दिवशी ” सेवाव्रती ” पुरस्कार, मान चिन्ह व पुष्प गुच्छ देऊन साजरा करण्यात आला.

ठाण्याच्या सरस्वती क्रीडा संकुलाच्या पहिल्या मजल्या वरील सभागृहात मध्ये हा कार्यक्रम झाला .
जिल्ह्यातील पहिला महिला रिक्षा चालक उषा इंगळे, पोलिस अधिकारी मीरा बनसोडे, धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या पुष्पा लेले, योगासनांच्या माध्यमातून बरा होऊ शकतो, यासाठी योग केंद्र चालविणाऱ्या सुषमा काळे, वन्यजीव छाया चित्रकार वेदवती पडवळ, रश्मी कशेळकर, स्वप्ना पिंपळे, वसुधा देशपांडे, देवश्री साने यांना शिल्पा मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. मनोगत व्यक्त करताना उषा इंगळे म्हणाल्या, ‘नवऱ्याने संसाराकडे दुर्लक्ष केल्या वर मला काम करणे भागच होते. उषा इंगळे ह्यांनी हे क्षेत्र निवडल्यावर कुटुंबीयांनी त्यांना विरोधच केला. पुरुषांप्रमाणे महिलाही रिक्षा चालवू शकतात हे त्यांना दाखवून द्यायचे होते. परवाना नसतानाही त्यांनी १५ दिवसात रिक्षा चालवायला सुरुवात केली. आज त्यांनी वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले आणि त्याचा त्यांना अभिमान आहे. घरातील माणसे, पुस्तके आणी योगासंनांमुळे सुषमा काळे कंसार सारख्या आजारातून बऱ्या झाल्या आणि आज त्या योग मुळे cancer बरा होऊ शकतो, हे त्यांनी योगासानाद्वारे सर्वांना पटवून दिले आणि देत आहेत. मीरा बनसोडे यांनी पालकांनी पाल्यांची काळजी कशी घ्यावी ह्याबाबत मार्गदर्शन केले सर्वात शेवटी प्रमुख पाहुण्या सौ. शिल्पा अनासपुरे यांनी गरीब गरोदर महिलांना त्यांच्या बाळंतपणानंतर त्यांना कल्शियम व लोह याच्या गोळ्या प्रत्येक घरा घरातून दान म्हणून मोफत देऊन एक प्रकारे समाज सेवा करावी असे आवाहन केले. त्यानंतर तीन लकी ड्रो काढण्यात आले व महिलांना बक्षिसे देण्यात आली. शेवटी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला. ह्या कार्यक्रमाचे फोटो एका महिला छाया चित्रकार वैशाली अय्या ह्यांनी काढले असून त्यांना सारा फौंडेशन तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.

                                      

 

सारा फौंडेशन च्या पुरस्कारांच्या चिन्हाचे महत्व म्हणजे मानचिन्हावर असलेली महिला ही काळाप्रमाणे सर्व बंधने तोडून आज स्वतःच्या अस्तित्वाच्या धडपडीसाठी बाहेर पडते असे दर्शविते आहे. ह्या मानचिन्हा वरची महिलेचे बोधचिन्ह, चित्रकार श्री. विजयराज बोधनकर यांनी दिले असून संस्था त्यांची कायमच ऋणी राहील.

श्री वि. ह. भूमकर सरांनी ह्या ओळी संस्थेसाठी लिहून दिल्या आहेत. संस्था भूमकर सरांची आभारी आहे.

मानचिन्हावर असलेल्या चारी ओळी :-

“मोराचा लक्षवेधी डौलदार पिसारा,
तसा संस्थेचा वाढतो आहे दैनंदिन पसारा,
सामन्यांच्या उद्धारास्तव वेळ देतो “सारा”,
तोच सेवाव्रती पुरस्काराचा मानकरी खरा “

                   

 

संस्थेचा पहिला महिला दिनाचा कार्यक्रम ८ मार्च २०१४ रोजी सरस्वती क्रीडा संकुल मल्हार सिनेमा समोर गोखले रोड नौपाडा ठाणे येथे संपन्न झाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. शिल्पा मकरंद अनासपुरे आल्या होत्या. त्यांची थोडक्यात ओळख श्रीमती सारंगी महाजन यांनी करून दिली. शिल्पा ताई ह्यांची व्यक्तीशः ओळख सर्वांना माहितीच असेल. त्या उत्कृष्ट आणि प्रसिद्ध अभिनेते श्री मकरंद अनासपुरे यांच्या पत्नी आहेत आणि त्या सुद्धा आपल्या ठाण्यातच राहतात. शिल्पा ताईंची करिअर ची सुरुवात बाल नाट्यान पासून झाली. ‘ जाऊ बाई जोरात ‘ हे त्यांचे पहिले रंगभूमी वरील नाटक होय नंतर त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी हिंदी व मराठी भाषेमध्ये सात ते आठ टी व्ही मालिका केल्या.

कालांतराने त्यांनी मराठी सिनेमे केले ‘छोटी डोंगरा एवढी गोष्ट ‘, ‘सुंभरान’, व ‘तुक्या तुकविला नाग्या नाचविला’, ‘रंग मनाचे’, इत्यादी मराठी सिनेमे केले. गोव्या मध्ये त्यांनी मराठी सिनेमा मध्ये काम केले, त्याचे नाव ‘गड्या आपला गाव बरा’.

शिल्पा ताई यांचा, ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ हा सिनेमा प्रदर्शित होण्या साठी तयार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये तॊ दाखविला जात आहे.
उमेश कुलकर्णी यांचा मराठी सिनेमा “हायवे” मध्ये त्यांचे चित्रीकरणाचे काम सुरु आहे. या व्यतिरिक्त, तळागाळातील मुलांसाठी काम करणाऱ्या “यशस्वी ” या सामाजिक संस्थे मध्ये त्यांच्या यजमानान बरोबर त्या काम करतात. तसेच गरीब गरोदर स्त्रियांच्या बाळंत पणा नंतर त्यांना काल्शियम आणि आयर्न ह्याची अतिशय गरज असते आणि हीच गरज पुरविण्याचे काम शिल्पाताई स्व खर्चाने गोळ्या देऊन करतात. ह्याच गोळ्या स्त्रियांना सरकार तर्फे मोफत दिल्या जाव्या अशी त्यांची इच्छा आहे. जव्हार, वाडा येथील आदिवासी मुलांसाठी कपडे वाटप करण्याचे काम करतात. यशस्वी ह्या सामाजिक संस्थेचे मकरंद अनासपुरे ब्रांड अम्बेसेडर आहेत.

 

सारा फौंडेशन ची थोडक्यात ओळख व उपक्रम:

          

             

 

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या’ व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालये, सामाजिक संस्था तसेच काही काही घरांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे आणि आज आपण आपल्या संस्थेचा पहिला महिला दिन ८ मार्च रोजीच साजरा करतोय.

थोडक्यात ‘सारा फाऊनडेशन’ विषयी :-
‘सारा फाऊनडेशन’ हि एक सामाजिक संस्था असून बहुउद्देशीय संस्था आहे. सध्या तरी संथेने एकच ध्येय किंवा उद्दिष्ट ठरवले नसून विविध सामाजिक नागरिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याचे ठरवले आहे. ऑक्टोबर २०१३ रोजी हि संस्था रजिस्टर झाली.

आमच्या संस्थे तर्फे खालील उपक्रम राबविले –

१) संस्थे तर्फे दिवाळीच्या सुमारास आदिवासी महिलांना सोबत घेऊन त्यांना मदत म्हणून उटण्याचा स्टॉल तीन दिवसाकरीता लावला होता. ह्यातून मिळालेली रक्कम ही पूर्णपणे आदिवासी महिलाना देण्यात आली. ह्या उपक्रमासाठी विवेकानंद वनवासी केंद्र डोंबिवली ह्या संथेने पूर्णपणे सहकार्य केले.

२) आगामी निवडणुकांचे महत्व लक्षात घेता सारा फाउंडेशन तर्फे १८ ते २५ या वयोगटातील तरुण मतदाता मुलांची नावे नोंदिविण्याचा उपक्रम येत्या वर्षभर हातात घेतला आहे तसेच समाजातील तरुणाई मधील उदासीनता लक्षात घेता हा उपक्रम कायम स्वरूपी चालविण्याचा संस्थेचा मानस आहे .ह्यातून सरकारी यंत्रणेला मदत करण्याचाच फक्त संस्थेचा हेतू आहे. संस्थेने काही कॉलेजेस मध्ये ३-३ दिवसाचे कॅम्प पण चालविले आहेत आणि ह्यातून      मुलांकडून उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे.   ३) आजचा हा संस्थेचा महिला दिनाचा तिसरा कार्यक्रम आहे.

मुंबई पोलिस मधील कर्मचारी श्री. नंदू सावंत ह्यांनी महिला दिनानिमित्त संस्थेला कविता सादर करण्यास दिली असता ती कविता वाचून दाखविण्यात आली. –

 

“सहजच….. दरवेळी सीतेनेच का आग्निपरीक्षा द्यावी,
कधीतरी ती रामाला ही देण्याची सक्ती करावी….?
दरवेळी मीरेनेच का विषाचा प्याला रिचवावा,
घनःशामाने ही तो कधीतरी ओठी लावावा….?
दर खेपेला दुष्टांनी द्रौपदीचंच का वस्त्र फेडावं,
आता द्रौपदीनंच दुषःसनाचं चांगलं मुस्काट फोडावं….?
त्यांच्या निष्पाप कोवळ्या भावनांना मिळेल का हो न्याय,
नऊ महिने गर्भात वाढवणार्या मातांवरील दूर होईल अन्याय….?     
किती दिवस,आणखी किती दिवस आपण,
स्त्री वरील अत्याचारावर मेणबत्त्या जाळणार,
फक्त दोन मिनीटं स्तब्ध उभे राहुन,
हात बांधुन,आसवं गाळंत मौन पाळणार….?
पण आता सावधान,
स्त्री आता अबला राहिलेली नाही,ती सबला झालीय….
वाटेला जाऊ नका तिच्या,
आता स्त्री शक्तिचा ईंगा दाखवण्याची वेळ आलीय….”

 

आजच्या महिला दिनाचे औचित्य साधून समाजासाठी शिवाय आपले कुटुंब चालविण्यासाठी तसेच आपली आवड जोपासण्यासाठी विविध स्तरावर महिला बाहेर पडताहेत अश्याच काही महिलांचा संथे तर्फे सन्मान करण्याचे ठरविले आहे.

महिलांची ओळख –

1) सौ पुष्पा लेले 

पुष्पा ताई मूळच्या ठाण्याच्या महाराष्ट्र विद्यालयाच्या विद्यार्थिनी. अर्थशास्त्रात बी .ए झाल्या वर त्यांचे लग्न झाले. यजमानांची बदलीची नोकरी होती. सुरत कोल्हापूर नंतर बारा वर्ष चेन्नई येथे बदली झाली. चेन्नई मधील ह्या बारा वर्षाच्या एका तपाचे पुष्पा ताई यांनी सोने केले. अर्थशात्रामध्ये बी ए असून सुद्धा हिंदी भाषेची गरज ओळखून त्या हिंदी विषयाकडे वळल्या. चेन्नई मध्ये हिंदी शिक्षक मिळत नसल्या मुळे त्यांनी हे आव्हान स्वीकारले. हिंदी विशारद एक व दोन तसेच हिंदी प्रवीण एक व दोन अश्या चार परीक्षा देऊन त्यांनी हिंदी मध्ये बी. ए .केले तसेच म्हैसूर विद्यापीठातून एम. ए. सुद्धा केले. दहावी बारावी च्या विद्यार्थांची बोर्डाच्या परीक्षेची तयारी करून घेण्याची जबाबदारी यशस्वी पणे पार पडल्या बद्दल १९९२ साली आदर्श शिक्षिकेच्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. १९९८ मध्ये परत यजमानांची बदली झाली आणि त्या परत ठाण्यात आल्या. स्वस्थ बसणे हा त्यांचा स्वभाव नसल्या मुळे परत त्यांनी संगीताचे अधुरे राहिलेले शिक्षण सुरु केले आणि श्री. बुधकर सरांचा भजनाचा क्लास ही लावला शिवाय संगीताची विशारद ही पदवी सुद्धा मिळवली.

खरे तर आपणा सर्वांनाच ५० शी नंतर काय करावे हा प्रश्न उपस्थित होतो, त्या वर पुष्पा ताईंना सुद्धा पन्नाशी नंतरच भजनी मंडळ सुरु करावे असे वाटले कारण त्यांच्या साठी हा रामबाण उपाय होता. अगदी ‘सा’ पासून टाळ हातात कसे वाजवावेत हे सर्व त्या क्लास मध्ये शिकवतात आणि त्याचा सराव करून घेतात त्याच जोडीला शास्त्रीय संगीतातील अलंकार व टाळ यांची सांगड घालून संगीताचा पाया पक्का करून घेतात. भजनात चांगला जम बसल्या मुळे एक धाडसी निर्णय घेऊन पुष्पा ताईंनी भजनी मंडळ सुरु केले. पुष्पा ताईंचे सात भजनी मंडळे कार्यरत आहेत आणि सव्वाशे महिला त्यांच्या कडे शिकताहेत. पुष्पा ताईचे खास वैशिट्ये म्हणजे ‘मंगळा गौरीचे खेळ ‘ असा त्यांचा कार्यक्रम आहे .झी टी व्ही वर हा कार्यक्रम झाला असून ठाण्या मध्ये ह्याचे बरेच कार्यक्रम होतात .ह्या कार्यक्रमाचे त्यांचे कडे दोन ग्रुप तयार आहेत. अतिशय वेगळ्या पद्धतीने हरिपाठ म्हणवून घेणे हे काम सध्या त्या करीत आहेत. याशिवाय नाट्य, कला ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असे अनेक गुण त्यांच्या मध्ये आहेत. प्रगल्भता आणि विनयशील स्वभाव तसेच शारदा आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या पुष्पा ताईंना आजच्या ‘सेवाव्रती’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

               

 

2)सुषमा सुरेश काळे, मुंबई

सेंट झेवियर्स कोलेज मधून एलेक्त्रोनिक्स मधून इंजिनियरिंग ची पदवी. नोकरी करत असताना स्वतः चा काही उद्योग सुरु करण्याची इच्छा म्हणून १९९७ मध्ये नोकरी सोडून स्वतःचे शेल कॉम्प्यूटर इनस्टीटयूट ठाणे येथे सुरु केले. हे इनस्टीटयूट सर्वात जुने म्हणून नावाजलेले आहे. ठाण्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कॉम्प्यूटरचे ट्रेनिंग. हे सर्व सुरळीत सुरु असताना अचानक आलेला प्रसंग म्हणजे २०१० मध्ये ब्रेस्ट cancer चे निदान. पण हिम्मत करून अण्णा व्यवहारे यांच्या कडून योगाचे शिक्षण, पुढे त्यातच करिअर आणि सामाजिक कामाला सुरवात. योगाच्या माध्यमातून cancer बरा होऊ शकतो ह्याचे महत्व पटवून देत ह्या मध्ये स्वतःची संस्कार योग इनस्टीटयूट सुरु व त्यातच कार्यरत होऊन स्वतःला गुंतवून घेणारी महिला म्हणून सुषमा ताई यांच्या ह्या योगदानासाठी सारा फौंडेशन तर्फे त्यांना सेवाव्रती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

            

         

 

3)कुमारी. देवश्री प्रमोदचंद्र साने, चेंबूर – मुंबई

सर्वात तरुण पुरस्कर्ती, वर्सेटाइल व्यक्तिमत्व म्हणून देवश्री ची ओळख करून देता येईल. शिक्षण सेठ जी एस एम सी आणि के इ एम हॉस्पिटल परेल येथून एम बी बी एस च्या दुसऱ्या वर्षाला. “द डेथ ऑफ द कोन्करर” ह्या नाटका मध्ये हिटलर च्या प्रेयसीची भूमिका करतेय. देवश्रीचे पहिले नाटक आहे. महारष्ट्र टाईम्स तर्फे घेण्यात येणाऱ्या श्रावण क्वीन २०१३ ‘सौंदर्य स्पर्धेत’ अंतिम फेरीत प्रवेश म्हणून निवड. बॉम्बे टाईम्स तर्फे रुइया कोलेज चा ‘फ्रेश फेस ‘ म्हणून २०१० मध्ये निवड २००८ -०९ महाराष्ट्र राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धे मध्ये प्रथम पारितोषिक देवश्री ला मिळालेले आहे. अश्या, गुणी विविध पैलू असलेल्या होणाऱ्या डॉक्टर ची, पुरस्काराची ची सुरुवात सारा फौंडेशन केली आहे. पुढे असेच अनेक पुरस्कार मिळण्यासाठी तिला सारा फौंडेशन तर्फे खूप खूप शुभेच्छा.

                             

 

4) सिनिअर पी.एस .आय मीरा बनसोडे, ठाणे

शिक्षण बी.कॉम.पर्यंत. १९८९ मध्ये महाराष्ट्र पब्लिक लोकसेवा आयोगा तर्फे पी.एस .आय म्हणून नियुक्ती. विमानतळ, मलबार हिल, ताडदेव, मुलुंड पोलिस स्टेशन आणि ठाणे येथे त्यांची पोस्टिंग झालेली आहे. सध्या नवी मुंबई पोलिस स्टेशन मध्ये डीटेक्शन ऑफिसर म्हणून त्यांचे पोस्टिंग झाले आहे. आज आपल्या कार्यक्रमात मीराताई वेळात वेळ काढून आलेल्या. सर्व जनतेच्या सुरक्षतेची काळजी घेणाऱ्या मीरा ताई यांना सारा फौंडेशन तर्फे सन्मानित करण्यात आले. त्यांनी जमलेल्या महिलांना थोडक्यात सुरक्षतेविषयी मार्गदर्शन केले.

         

 

5)सौ .रश्मी कशेळकर, नवी मुंबई

शिक्षण बी. एस. सी., बी.एड. रत्नागिरी येथे अष्टविनायक सर्जिकल ह्या नावाने अपंग पुनर्वसन केंद्र आणि मोफत सल्ला मार्गदर्शन केंद्र. गेली अठरा वर्षे अपंगांना मार्गदर्शन आणि मदत. जागतिक आरोग्य संघटने सोबत पोलिओ सर्वेलंस ऑफिसर म्हणून रत्नागिरी जिल्ह्या साठी दोन वर्षे काम. ‘जिजाई महिला सेवा संस्था’ सिंधुदुर्ग यांच्या तर्फे 2010 रोजी अपंग समुपदेशन कार्यासाठी महिला पुरस्कार. महाराष्ट्र पातळीवर अनेक अंकांमध्ये पंचवीस एक ललित लेख प्रसिद्ध झाले आहेत.
रश्मी ताईंचे वैशिष्ठ्य म्हणजे त्या मालवणी भाषेचा शब्द संग्रह तयार करीत आहेत. निस्वार्थी पणे अपंगांची निशुल्क मार्गदर्शन आणि सेवा करणाऱ्या रश्मी ताई यांना सारा फौंडेशन तर्फे सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.

              

 

6) सौ. उषा मोहन इंगळे, विटावा

प्रतिकूल परिस्थिती वर कशी मात करता येते ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे उषा इंगळे. शिक्षण फारसे नाही, पदरात दोन लहान मुले, रोजचा चरितार्थ चालवण्या इतकी सुद्धा मिळकत नाही. स्वतः जवळ काहीही पैसा नसताना प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांनी दोन लाख पाच हजाराचे कर्ज मिळविले आणि अतिशय वेगळे असे धाडस करून नवी कोरी ऑटो रिक्षा खरेदी केली. आज त्यांची गरज म्हणून त्या ऑटो रिक्षा चालवायला शिकल्या व त्यातूनच त्यांनी कुटुंबाचा उदार निर्वाह करण्याचे ठरविले. रोजच्या रोज पैसे मिळवणे हे त्यांच्या साठी अत्यंत गरजेचे असल्यामुळे, ऑटो रिक्षा चालवल्यास आपल्याला रोजच्या रोज पैसे मिळवता येतील असे त्यांना वाटले, म्हणून त्यांनी ऑटो रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला. आज त्या सकाळी सात ते दोन ह्या वेळेत ठाणे स्टेशन ते विटावा अशी शेअर रिक्षा चालवितात. दरमहा सहा हजार आठशे रुपये कर्जाचा हप्ता देऊन सुद्धा त्यांचा चरितार्थ त्या चालवू शकतात. आज महिला दिनाच्या दिवशी विशेष नमूद करावेसे वाटतेय कि त्यांच्या सांगण्या प्रमाणे ऑटो रिक्षा चालवताना त्यांना कोणत्याही वाईट प्रसंगांना कोणाही कडून सामोरे जावे लागले नाही तसेच महिला ऑटो रिक्षा चालक म्हणून पोलिस सुद्धा त्यांच्या कडे सहानु भूतीने आणि सन्मानानेच पाहतात. आज ठाणे जिल्ह्यातील पहिली महिला ऑटो रिक्षा चालक म्हणून त्यांना सेवाव्रती पुरस्काराने गौरविण्यात आले.

          

7) स्वप्ना राजेश पिंपळे, घोडबंदर रोड – ठाणे

केळकर वझे कोलेज मधून शिक्षण पूर्ण. स्वप्नाला दोन मुले आहेत. त्या पैकी मोठा मुलगा अक्षय Instrumentation engineering चे कर्जत येथे शिक्षण घेतोय. त्यांनतर तेजस्वी ही तिची मुलगी. तीचा जन्म १९९६ मध्ये झाला. जन्मतःच शरीराने अपंग. स्वप्नाची आवड पेंटिंग, चारोळ्या, कविता तयार करणे, उर्दू शायरी लिहिणे, इंग्रजी आणि मराठी मध्ये वाचनाची आवड. प्रवासाला जाण्याची आवड, विशेषतः वन्यजीव पाहण्याची आवड. शरीराने पूर्ण अपंग असणाऱ्या मुली भोवती आपले संपूर्ण आयुष्य बांधून घरातच आपली कला जोपासणारी महिला स्वप्ना पिंपळे, हिला आज सारा फौंडेशन ने सन्मानित करण्यात आले.

                

8) नेहा पुरव, बोरीवली – मुंबई

सहारा  न्युज, झी न्युज, आफ्टरनून न्युज पेपर ,हिंदुस्थान समाचार इत्यादी मध्ये संवाददाता म्हणून काम केले आहे. सध्या नेहा जय महाराष्ट्र वाहिनी साठी काम करते आहे. आमदार खासदार तसेच शासकीय अधिकारी यांच्या मुलाखती तिने घेतल्या आहेत.सर्व साधारणपणे वृत्त वाहिनी वर काम करणाऱ्या व्यक्तीन विषयी सामन्यांचे मत हे फार वेगळे असते, परंतु नेहा त्या मध्ये मोडत नाही कारण ती निस्वार्थी           भावनेने आणि खरी खुरी बातमी लावण्यामध्ये ओळखल्या जाते. नेहाचे शिक्षण बी.एस.बी एड .व मार्केटिंग मध्ये एम.बी.ए. झेवियर्स कोलेज ऑफ कमुनिकेशन मुंबई मधून २००१ ला जर्नालिझम चा डिप्लोमा पूर्ण. जर्नालीस्ट ट्रेनी म्हणून युनिक फीचर्स चे काम(इन)इन मुंबई मध्ये संवाददाता.

विशेष उल्लेखनीय मुलाखतींमध्ये, बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार आणि सर्व मोठ्या राजकीय व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. तिचा अल्बम ह्या सदराखाली माझी सुद्धा मुलाखत नेहा ने घेतली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून खऱ्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या नेहा ला सारा फौंडेशन तर्फे सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

                    

 

9) वेदवती पडवळ – ठाणे

जे जे इनस्टीटयूट मधून छाया चित्रण हा खास विषय घेऊन कमर्शियल आर्ट्स ची पदवी २००६ साली घेतली. शाळेत असताना अमेरिका जापान येथील कला प्रदर्शनात चित्र प्रदर्शित झाली आहेत. २००५ ला स्मार्ट फोटोग्राफी मध्ये प्रथम पारितोषिक. वन्य जीवन सप्ताहाच्या निमित्ताने अमरावती येथे घेण्यात आलेल्या छाया चित्र स्पर्ध्ये मध्ये स्कोर्पियन विथ बेबीस ह्या छायाचित्राला प्रथम पारितोषिक. वेदवतीला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पारितोषिके आणि पुरस्कार मिळालेले आहेत. वन्य जीव छाया चित्र हा छंद असतानाच व्यवसाय म्हणून कमर्शियल फोटोग्राफी चा स्वतः चा स्टुडिओ आहे. शास्त्रशुद्ध छाया चित्रणाची कार्यशाळा सुद्धा ती घेते. अश्या ह्या तिच्या लहान वयात तिने आपली आवड म्हणून वेगळे करिअर निवडले आणि त्यात भरपूर पारितोषिके व पुरस्कार पण घेतले. शाळेपासून ते आज पर्यंत अनेक पुरस्कार मिळालेल्या वेद्वतीला सारा फौंडेशन तर्फे ‘सेवाव्रती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

 

               

 

10) वसुधा देशपांडे, कल्याण

वसुधा ताई ह्या ठाणे शहराला परिचितच आहे. त्यांची नव्याने ओळख सांगायची गरज नाही विविध प्रदर्शनांमध्ये त्यांचे स्टॉल लागतच असतात. आद्याक्षरा ह्या नावाचा ब्रांड असलेल्या रजया, स्लीपिंग बग्स, होल्डाल, इत्यादी तयार करणे व विकणे हा वसुधा ताई यांचा छंद, व्यवसाय आहे. वयाच्या चाळीसाव्या वर्षी वसुधा ताईंना त्यांच्या व्यवसायाची दिशा मिळाली. २००६ साली अवघ्या शंभर रुपयाच्या भांडवलावर त्यांनी हा व्यवसाय सुरु केला. स्वतः विविध प्रदर्शनांमध्ये भाग घेऊन स्वतःच्या मालाची विक्री त्या स्वतःच करतात. दादर, ठाणे, बोरीवली, पुणे, औरंगाबाद, नाशिक, गोवा इत्यादी शहरांमध्ये प्रदर्शनात त्या भाग घेतात. नवीन जन्मलेल्या बाळा पासून ते वृद्धांपर्यंत वयानुरूप वेगवेगळ्या आकारात त्या त्या वयोगटाला आवडतील अश्या रंगसंगतीच्या रजया त्या तयार करतात. अनेक दैनिके मासिके वृत्तपत्रांमधून त्यांचे कौतुक, पुरस्कार तसेच मुलाखतीही घेतल्या गेल्या आहेत. अश्या या सर्वांना परिचित असलेल्या वसुधा ताई यांना आज सारा फौंडेशन तर्फे सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.