
‘सारा फौंडेशन’ ह्या सामाजिक संस्थे तर्फे रविवार २९ जून रोजी संध्याकाळी ५ ते ७ ह्या वेळेत सरस्वती मराठी शाळेचे क्रीडा संकुल मल्हार सिनेमा समोर ठाणे पश्चिम येथे पहिल्या मजल्या वर “घर बसल्या लघु उद्योग” ह्या विषयावर व्यवसाय मार्गर्दशन पर व्याख्यान ठेवण्यात आले .
सारा फौंडेशन चा एक आगळा वेगळा कार्यक्रम २९ जुन २०१४ रोजी यशस्वी झाला
ह्या कार्यक्रमात ठाणे लघु उद्योग केंद्राचे कमिश्नर माननीय श्री अनिल कुमार चांदोरिकर हे स्वतः मार्गदर्शन करण्यासाठी आले होते एक रुपया पासून एक कोटी पर्यंत कसा व्यवसाय वाढविता येतो तसेच घरबसल्या महिलांनी कोंकोंटे लघु उद्योग व गृउद्योग केल्यास त्यांना कसा व्यवसायातून फायदा होऊ शकेल यावर सविस्तर मार्गार्धन केले
श्री चांदोरकर सर यांच्या हस्ते ”सारा फौंडेशन’ ह्या संस्थेच्या वेब साईट चे उद्घाटन झाले हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता आणि त्याचा सर्वांनी लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी पणे पार पडला ह्या मध्ये प्रश्नोत्तरा द्वारे लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद दिसून आला
.ह्या कार्यक्रमानंतर संस्थेच्या अध्यक्षांना लघु उद्योग सुरु करणेबाबत अनेक जणांचे फोन आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यात संस्थेच्या सर्व महिलांनी योगदान दिले
धन्यवाद !
सारंगी प्रवीण महाजन
अध्यक्षा , सारा फाउंडेशन