
दिवाळी पूर्वी ११,१२,१३,ऑक्टोबर २०१४ रोजी सारा फौंडेशन तर्फे आदिवासी महिलांना आर्थिक मदत म्हणून तीन दिवसा साठी ठाणे येथे प्रदर्शनात आदिवासी महिलांनी बनविलेले उटणे व संत्रासाल पावडर तसेच काही मोत्याच्या वस्तूंचे टेबल लावले होते .
ह्या मध्ये ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला ह्या आदिवासी महिला कसारा पुढील विहीगाव येथून आलेल्या होत्या सारा फौंडेशन तर्फे आलेला सर्व पैसा पूर्णपणे त्यांना देण्यात आला .
संस्थे तर्फे क्षमा पातकर अनिता जोशी दातार ताई सुमती महाजन रीना राजे ह्यांनी पूर्ण पणे जबाबदारी स्वीकारली