
लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त “सारा फौंडेशन” तर्फे आरोग्य शिबीर घेण्यात आले .सामाजिक उपक्रम म्हणून वैद्यकीय शिबीर घेण्याचे सारा संस्थे ठरविले. ह्या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ जनतेला व्हावा हाच हेतू सारा संस्थेचा आहे .
ठाणे महानगर पालिकेच्या दगडी शाळा ,चरई,ठाणे.येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले शिबिराची वेळ सकाळी ८ ते २ होती शिबीर यशस्वी करण्यात सारा च्या सर्व महिला सदस्यांचे मोलाचे योगदान होते
सर्व तपासण्या सारा संस्थे तर्फे मोफत करून देण्यात आलेल्या. ह्यामध्ये रक्त तपासणी चरबी तपासणी शुगर, वजन,लिपिड प्रोफाइल, डोळे तपासणी व हृदयाशी निगडित सर्व तपासण्या मोफत करून देण्यात आल्या तसेच दुसऱ्या दिवशी रिपोर्ट चे वाटप सुद्धा सारा च्या सर्व महिलांनी केले. ठाण्यातील नामांकित डॉक्टर , डॉक्टर रोहित गोखले हृदय रोग तज्ञ वेलनेस हॉस्पिटल ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर घेण्यात आलेले
या शिबिरामध्ये हृदय तपासणी डॉक्टर. रोहित गोखले .एम .डी. (मेडिसिन)मुंबई.(फ़िजिशिअन , कार्डीओलोजीस्ट , डायबीटोलोजीस्ट)करणार आहेत.लहान मुलांच्या दातांची तपासणी डॉक्टर सुरजीत रावल (बी डी एस) तसेच जनरल तपासणी डॉक्टर पारस जैन(जनरल फ़िजिशिअन )यांचे कडून तपासण्या झाल्या