
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णपंच गंगा नदीचे पाणी गावात शिरल्याने बरीच घरे पाण्याखाली गेलेली. सारा संस्थेने दखल घेत, तेथील ‘जय शिवराय तालीम मंडळ’ मधील सर्व तरुण सदस्यांना संपर्क करून मदत करण्याचे आश्वासन दिले.
1000 रू प्रत्येक घरा प्रमाणे 50 हजाराचे धान्य 50 घरात भरून देण्यास कबूल केले. त्या पैकी सर्व घरात धान्य वाटप झाले.
सारा फाऊंडेशन च्या वतीने तेथील निवासी श्री अनिकेत कामटे यांनी संपूर्ण जबाबदारी उचलली.

सारा संस्थेच्या अध्यक्षा सारंगी ताई महाजन यांनी ‘श्री क्षेत्र नृसिंह वाडी’ येथील, श्री महेश पोरे लोककल्याण किराणा स्टोअर्स चे मालक यांना धान्य वाटपासाठी डायरेक्ट संपर्क केला.
ह्या मध्ये अनिकेत कामटे यांचे सहकार्य, तसेच जय शिवराय तालीम मंडळाची संपूर्ण टीम कामाला लागलेली.

दिलेल्या धान्याची यादी –
तांदूळ 5 किलो
तूरडाळ 1 किलो
तेल 1 किलो
साखर 1 किलो
GS चहा 100 ग्राम
मुगडाळ 1 किलो
पार्ले जी बिस्कीट 1 पाकीट
आटा 5 किलो
ब्रश 1
पेस्ट 1
संतूर साबण 1
इत्यादी रोजच्या वापरात लागणाऱ्या वस्तू देण्यात आल्या.
सारा फाऊंडेशन ची मदत नृसिंह वाडी ला सारंगी ताई महाजन यांच्या मुळे मिळाली.
जय शिवराय तालिम मंडळाकडून पुरग्रस्तानां मदत केल्याबद्दल सारा फाऊंडेशन चे आभारी आहोत.

वाडी येथील जनतेने कधी आवाज दिला तरी सारा फाऊंडेशन कायम वाडी वासियांसाठी उभी असते, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
सारंगी ताई महाजन, ठाणे यांनी पुढाकार घेऊन मदतीचे आव्हाहन स्वीकारले, त्या बद्दल ताईंचे मनापासून आभारी आहोत.