
दिनांक २६ जून रोजी राजश्री श्री शाहू महाराज यांच्या 145 साव्या जयंती निमित्त सारा फौंडेशन तर्फे जिल्हापरिषदेशांच्या विविध शाळेत वह्या वाटप कार्यक्रम घेण्यात आले. त्या पैकी एक कार्यक्रम नृसिंह वाडी येथील विद्यामंदिर येथे जिल्हापरिषदेच्या शाळेत घेण्यात आला, सारा संस्थे तर्फे इयत्ता पहिली ते सातवी वर्गा पर्यन्त च्या सर्व मुलांना प्रत्येकी सहा वह्या पुरविण्यात आल्या.
विद्यामंदिर ही शाळा शिरोळ तालुक्यातील जिल्हा स्तरावरील पहिल्या क्रमांकावरची शाळा आहे. ह्या शाळेतील विद्यार्थी अत्यंत हुशार असून शिस्तीत अभ्यास व इतर कार्यक्रमात सहभाग घेत असतात.
शाळेतील शिक्षकांचे पूर्णपणे योगदान आहे. ह्या शाळेतील इयत्ता सातवीतली मुलगी क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी विमान प्रवासाने गेलेली आहे. ह्याचा शाळेला सार्थ अभिमान आहे. ह्या शाळेत असेही विद्यार्थी आहेत की ज्यांनी आपल्या दप्तरात पहिल्यांदा नवीन वह्या पाहिल्या आहेत. आज संस्थेने त्यांना वह्या देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे.
संस्थे तर्फे हा कार्यक्रम यशस्वी करण्यात संस्थेच्या अध्यक्षा सारंगी महाजन तसेच, कार्याध्यक्ष श्री योगेश पिंगळे व उपाध्यक्षा अनघालक्ष्मी महाजन उपस्थित होते. नृसिंहवाडी येथील जय शिवराय तालीम मंडळ ह्या संस्थेची मदत संस्थेला कार्यक्रम यशस्वी करण्यात झाली.





शाळेची थोडक्यात माहिती
विद्या मंदिर नृसिंह वाडी
तालुका शिरोळ , जिल्हा कोल्हापूर
श्री दत्त गुरूंचे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या तपस्येने पावन झालेले श्री क्षेत्र नृसिंह वाडी तथा नरसोबावाडी कृष्णा आणि पंच गंगा या संगमावर वसले आहे. नृसिंहवाडीत विद्या मंदिर नृसिंहवाडी या शाळेची स्थापना १ जानेवारी १८५५ रोजी झाली असून आज ह्या शाळेत पहिली ते सातवी हे वर्ग भरतात एकूण 250 विद्यार्थी ज्ञानार्जनाचे काम करतात व 8 शिक्षकांचे अध्यापनाचे कार्य सुरू आहे. आपला पाल्य हा एक सुजाण नागरिक बनावा अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्याची पूर्तता करण्यासाठी शालेय अध्यापक वर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य 100% प्रयत्न करीत असतात. तसेच शाळेतील मुलांची गुणवत्ता वाढविण्याचा सुद्धा शिक्षकांचा प्रयत्न असतो.
शाळेची ठळक वैशिष्ट्ये
1)पहिली पासून सेमी इंग्रजी वर्ग
2)सुसज्ज संगणक कक्ष
3)विविध शासकीय योजनांचा लाभ
4)विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन
5)सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत जिल्हा स्तरावर यश
6)स्नेहसंमेलन व बाल आनंद मेळावा
7)पालक मेळावा व त्यांच्या विविध स्पर्धा
8)सुसज्ज ग्रंथालय व प्रयोग शाळा
9)इस्रो भेटीसाठी विद्यार्थी निवड
10)नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत यश
11)ऍबकस स्पर्धेत घवघवीत यश
धन्यवाद!
अध्यक्षा
श्रीमती सारंगी प्रवीण महाजन