२४/१२/२०१६ ‘सारा’ चा ३ रा वर्धापन दिन साजरा

कमी तिथे आम्ही हि विचारधारा घेऊन गेल्या ३ वर्षांपासून ठाण्यात सामाजिक कार्य करणाऱ्या सारा फौंडेशन चा ३ रा वर्धापन दिन गडकरी रंगायन येथे साजरा करण्यात आला. पूर्वांचल मधील आसाम आणि मणिपुर राज्यातील ‘बिहू’ हे आसाम मधील लोकप्रिय नृत्य सादर करून ठाणेकरांची मने जिंकली. वर्धापन दिनी लोकनृत्यासह फ्युजन डान्स अकॅडेमी च्या कलाकारांनी ‘मारिया मारिया’ या गाण्यावर पाश्चिमात्य पद्धतीने नृत्य सादर केले. त्यानंतर सादर झालेल्या नृत्यातून आजचे पोलीस वर्दीचे वास्तव उलगडण्यात आले. आजच्या घडीला पोलिसांना वेळेचे बंधन न पाळता कर्तव्ये पार पदवी लागतात. शिवाय गेल्या काही महिन्यात पोलिसांवर झालेले हल्ले ह्या नृत्यातून दाखविण्यात आले. उपस्थितांनी ह्या नृत्याला टाळ्या वाजवून साथ दिली. नृत्याचे दिग्दर्शन चेतन सावंत ह्यांनी केले. ह्यावेळी ठाणेतील अंजुमन गर्ल्स स्कूल च्या अमेंडलिपी व ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. ५५ च्या शिक्षिका विणा ताजणे ह्यांनी सारा फौंडेशनला शुभेच्छा दिल्या, तर ‘आधुनिक भारत परिवार’ ह्या संस्थेचे संदीप खांबे ह्यांनी सारा फौंडेशन च्या कार्याचे कौतुक केले. सारा फौंडेशन च्या संस्थापिका श्रीमती सारंगीताई महाजन ह्यांनी उपस्थित मान्यवरांचे सत्कार केले. कार्यक्रमाचे निवेदन बंटी देसाई ह्यांनी केले. सर्व कार्यक्रमाचे आयोजन सारा फौंडेशन चे कार्याध्यक्ष योगेश पिंगळे ह्यांनी केले. सर्व इतर सदस्यांचे सहकार्य कार्यक्रमाला लाभले. कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

धन्यवाद!