११ फेब्रुवारी २०२० ‘सारा कडून विनम्र श्रद्धांजली’

दिवस तीन फेब्रुवारीचा… अंकिता पिसुड्डे महाविद्यालयात शिकविण्यासाठी जात होती. विकेश ऊर्फ विक्‍की नगराळेने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले. यात ती गंभीर भाजली गेली.. नागपूर येथे उपचार सुरू असताना तिचा ११ फेब्रुवारीला मृत्यू झाला.
विदर्भातील वर्धा जवळील हिंगणघाट येथे जे अमानुष कृत्य घडलं त्या साठी विकेश नागराळे याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
तसेच निरपराध कुमारी प्राध्यपिका अंकिता पिसुदे हिला सारा फौंडेशन तर्फे श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
ह्या वेळी भाजपा प्रवक्ते माधव भंडारी, सारंगीताई प्रवीण  महाजन, अभिनेते जयराज नायर,सारा संस्थेचे कार्याध्यक्ष श्री योगेश पिंगळे  एन्काऊंटर स्पेशालिस्ट श्री रवींद्र आंग्रे,देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री विलास जोशी ,वनिता पाठक, राहुल तेली,शुभांगी धबडगाव,स्वप्ना पाठक, संदीप गुटका आणि सारा फॉउंडेशन चे इतर सदस्य उपस्थित होते.
कुमारी अंकिता पिसुदे हिला भावपुर्ण श्रद्धांजली !
सारा फाउंडेशन