
२०१६ जानेवारीच्या सुरुवातीपासून शनि शिंगणापूर येथील शनि देवताच्या चौथऱ्यामध्ये महिलांना प्रवेश मिळण्याच्या मागणीवर निषेध करण्या साठी सतत पाठपुरावा करून २६ जाने वारी रोजी शनि शिंगणापूरला १२२ महिला व पुरुषांना घेऊन जाणारी एकमेव सारा संस्थे ला यश आले आहे . समस्त हिंदुंच्या भावना दुखावणारा विषय घेऊन काही विकृत महिलांनी चौथऱ्या मध्ये प्रवेश करण्यासाठी येणार असे कळताच सारा फौंडेशन ने पुढाकार घेऊन त्याचा निषेध व्यक्त केला महिलांना चौथऱ्या मध्ये प्रवेश तर नाहीच पण शनि शिंगणापूरला सुद्धा येण्यापासून ह्या महिलांना अडविण्यात आले होते. शनि शिंगणापूर हा धार्मिक मुद्दा असून हिंदुच्या श्रद्धेला ठेच पोहोचेल असे कोणतेही पाउल सारा फौंडेशन ने उचलले नाही प्रशासन ,तसेच स्थानिक पंचक्रोशीतील महिला संघटना व शनि शिंगणापूर देवस्थानच्या कमिटी ला सारा फौंडेशन तर्फे सहकार्य दिल्या गेले संस्था ह्या विकृत महिलांच्या विचारांच्या विरोधात आहे.