
सारा फौंडेशन ह्या सामाजिक संस्थेचा दुसरा वर्धापन दिन १९ डिसेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाच्या नृत्याने झाली. तसेच सावरकर ह्यांच्या प्रायोपवेशनाचे हे ५० सवे वर्ष म्हणून जयोस्तुते हे गीत शाळकरी मुलांनी सादर केले. त्यानंर भारत मातेचे पूजन करून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सारंगी महाजन ह्यांनी सारा संस्था काय काम करते हे थोडक्यात सांगितले. नंतर शरद जी पोंक्षे यांचे समवेत प्रश्नोत्तराच्या संवादात्मक कार्यक्रमाला सुरुवात झाली.
संस्थे तर्फे अभिनेता आपल्या भेटीला हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. ह्या मध्ये श्री शरद पोंक्षे यांना तरुण म्हणजेच शाळा कॉलेजेस मधील मुलांशी संवाद साधण्यासाठी बोलावण्यात आले होते. तरुण मुलांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्या साठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रश्नोत्तराच्या रूपाने हा संवादात्मक कार्यक्रमात मुलांनी खूप छान व अभ्यासात्मक प्रश्न विचारले. संस्थे ने ५ प्रश्नांना बक्षिसे ठेवली होती .
१) कुमारी श्रावणी प्रशांत मो्. ह. विद्यालय ठाणे येथील दहावीच्या विद्यार्थिनी ने विचारलेला प्रश्न.
मुलांना खूप वाटतेय कि मी शिक्षण मंत्री बनलो तर हे करेन ते करेन पण तुम्हाला काय वाटतेय कि ह्या आम्हा विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागण्या आहेत का ? कि शिक्षण पद्धती आमच्या मागण्यांचा पुरवठा करत नाही नक्की विद्यार्थ्यांचं चुकते कि शिक्षण पद्धतीच ??
ह्या प्रश्नावर शरदजी सविस्तर बोलले असून ते म्हणाले, आज हि आपल्याकडे ब्रीटीशांचीच शिक्षण पद्धती राबविली जाते ४७ साली देश स्वतंत्र झाला ब्रिटीश गेले. त्या वेळी त्यांच्या सोबत त्यांच्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी जायला हव्या होत्या पण सर्वच ते इथे भारतात सोडून गेले आणि आपण त्यांच्या गोष्टी आचरणात आणल्या आणि म्हणूनच आपल्याला हे सर्व पाहायला मिळते. हे सर्व बदलणे म्हणजे प्रचंड मोठी राज्यक्रांती व्हायला पाहिजे.
२)योगिता अनंत उबाळे जोशी बेडेकर महाविद्यालय टी वाय बी एम एम
योगिता हि पत्रकारितेची विद्यार्थिनी, तिचा प्रश्न असा कि पूर्वीची वर्तमान पत्रे जी होती ती समाज प्रबोधन, स्वात्यंत्र किंवा अन्याया विरुध्द लेखन या अनुषंगाने प्रकाशित होत होती परंतु आता फक्त व्यावसाई करण आणि राजकारण किंवा च्यानल चे टी आर पी वाढविण्यासाठी माध्यमांचा वापर केला जातो तर ह्या वर आपले काय मत आहे ?ह्याला जबबदार आजची बदलती विचारधारा प्रत्येकाला रुपये कमवायचे असतात आणि प्रसिद्धी हवी असते मग त्या मध्ये सत्याचा बळी गेला तरी चालेल आणि म्हणूनच पिडीत व्यक्तीला अधिक पिडीत करून टी आर पी कसा वाढवायचा ह्याचा विचार केला जातो बदलती राजकीय परिस्थिती समाजकारण आणि बदलती सामाजिक मानसिकता ह्या मुळे हे सर्व प्रश्न भेडसावत आहे.
३) हर्षदा प्रकाश शिनकर जोशी बेडेकर कोलेज टी वाय बी एम एम ची विद्यार्थिनी ने विचारलेला प्रश्न
आज कालची तरुणाई मराठी नाटक आणि सिनेमा पाहण्या कडे का वळत नाही ?
त्या वर शरद जी म्हणाले कि आज काल शाळा कॉलेजेस मध्ये मराठीभाषे वर जोर दिला जात नाही. इतर प्रांतात त्यांचे कडे त्यांच्या मातृभाषेवर जोर दिल्या जातो उच्च दर्जाची मातृभाषा शिकविले जाते आणि त्याची सक्ती प्रत्येक शाळा कॉलेजेस मध्ये आहे. अगदी उलटे केले तर आज महाराष्ट्रात सर्व शाळा कॉलेजेस इंग्रजाळलेले आहेत त्यामुळे तरुण मुलांमध्ये मातृभाषेचा अभाव दिसून येतो ह्या शिक्षण पद्धतीचा प्रश्न सर्व राजकीय व्यवस्थेवर येउन थांबतो. राजकीय लोक किंवा सरकार मधले शिक्षण पद्धती चालविणारे जे कोणी आहेत त्यांच्या इच्छा शक्तीचा हा अभाव आहे उच्च दर्जाची मराठी हि पहिली पासुंनच सक्तीची करायला हवी. इतर प्रांतांच्या मानाने महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी शाळेला काही किंमत नाही. आमचीच मराठी भाषेची मुले सर्वच इंग्रजाळ लेली आहेत. जिथे मराठी भाषा शब्द कळत नाही ते मुले नाटकाला येणार कशी? बाळ कोल्हटकर यांचे लहान पण ,त्या तिघांची गोष्ट , नथुराम ,ह्यातली भाषा कळणार कशी हे सर्व आपण च शिकवायचे असते. यशवंत राव चव्हाण ह्यांचे मातृभाषेचे विद्यापीठ आहे. त्याला आज खूप मोठी प्रसिद्धी मिळायला हवी. English is the language of tuition and Marathi is the language of intuition असे त्यांनी कुठे तरी वाचनात आले, ह्याचा हि उल्लेख केला.
४) रुचिर ठाकरे बी . इ . च्या विद्यार्थिनीने विचारलेला प्रश्न.
मराठी चित्रपट international level ला जाण्या बद्दल चा प्रश्न होता. त्या वर शरद जी म्हणाले कि भारताचा पुरस्कार मिळाल्या वर आंतरराष्ट्रीय ऑस्कर अवार्ड मिळण्याचे वेद असते तो टिळा लागलाच पाहिजे असे वाटतय पण आपला भारतीय पुरस्कार हाच खरा सन्माननीय पुरस्कार आहे ह्याचे महत्व त्यांनी पटवून दिले.
५) प्रणव रणभिसे आनंद विश्व गुरुकुल ११ विचा विद्यार्थी चा प्रश्न
समाज कल्याणासाठी तुम्ही काय करता ? आणि त्या संबंधी तुमचे काय मत आहे तसेच आजच्या भ्रष्टाचारी युगात भारताचे नागरिक म्हणून तुमच काय मत आहे ?
शरदजी म्हणाले मी प्रथम अभिनेता आहे. अभिनय माझा श्वास आहे पण मी समाज कल्याणासाठी आज शिवसेनेचा उपनेता पण आहे. हिंदुत्व आणि मराठी भाषा, देशा विषयी चे प्रेम ह्या वर मी बोलतो आणि आज समाज कल्याणासाठी मी ह्या उप नेत्याच्या पदाचा वापर करतो. पण अभिनयात मला आवड असल्याने मी जास्त रममाण होतो. एखादे क्षेत्र हे आपल्या आवडीनेच निवडावे. आपल्याला आई वडील म्हणतात म्हणून किंवा कोणाच्या दबावाखाली आपण आपला निर्णय घेऊ नये. त्यामुळे आपलेच नुकसान होते. आपल्याला आवड नसलेले क्षेत्र आपण निवडले तर आपण त्यात यश मिळवू शकत नाही. आपली स्वतंत्र विचार सारणी हवी. आपली बुद्धी वापरावी. हेच महत्व त्यांनी पटवून दिले.
कार्यक्रमाची सांगता वन्दे मातरम ह्या गीताने झाली.
संस्थे तर्फे क्षितिजा ने निवेदन केले तसेच सुशांत फाटक ह्याने आभार प्रदर्शन केले .
संस्थेचे सदस्य क्षमा पातकर, योगेश पिंगळे , कपिल महाजन – Secretary , सोनाली चिल्लाळ , वनिता चव्हाण, प्रियांका चिल्लाळ, प्रणोती नातू (चिपळूण), रीना राजे ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.