
सारा फौंडेशनकडून शासनाकडे पाठपुरावा करण्याचे व मदतीचे आश्वासन
वसई येथे अपंग जनशक्ति संस्थे तर्फे अपंगांच्या साहाय्यतेसाठी व त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी वसई स्टेशन पासून ते तहसीलदार ऑफिस, जवळ जवळ सात किलोमीटर पर्यंत मोर्चा काढण्यात आला. तसेच वसई येथील तहसीलदार कोळी यांना भेटून निवेदन दिले.
संस्थेचे पदाधिकारी व अपंग महिला व पुरुष यांनी आज पासून तहसीलदार कार्यालया समोर मागण्या पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण सुरु केले होते.
मोर्च्यामध्ये १०० च्या वर महिला, पुरुष, युवा तसेच अपंग व्यक्तींचा सहभाग होता. तसेच श्री प्रसाद साळवी, स्वतंत्र फौंडेशन चे पदाधिकारी आणि
सारा फौंडेशन यांचा जाहीर पाठींबा होता. अपंगांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सारा फौंडेशन तर्फे पाठपुरावा करण्यात व सारा चा भविष्यात पूर्ण सहकार्य करण्यात सहभागी होणार असे आश्वासन देण्यात आले.
धन्यवाद!