26 फेब्रुवारी 2020 सारा तर्फे मेडिकल मदत

सारा ट्रस्ट कडून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वैद्यकीय मदतीच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे.
गेले 4 ते 5 दिवस सारा फाउंडेशन मध्ये सामाजिक कामात मदत करणाऱ्या  अझीम नावाच्या मुलाचे वडील हमीद सय्यद वय वर्ष 60 यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना हार्ट चा त्रास होता. कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात त्यांचे केस पेपर काढून त्यांच्या सर्व टेस्ट झाल्या. त्यांना 2D Eco टेस्ट सांगितली. त्या टेस्ट साठी तारीख 3एप्रिल दिल्या गेली.
सारा संस्थेच्या मदतीने 8 दिवसाची तारीख करून देण्यात आली. पेशंट हमीद  सय्यद यांना रोज रात्री श्वासोश्वासाचा त्रास होत असल्यामुळे ऑक्सिजन लावावा लागत असे. शिवाजी हॉस्पिटल कळवा जिल्हा ठाणे, येथे त्यांच्या टेस्ट करून देण्यात आल्या.
सारा च्या माध्यमातून अश्या बरीच लोकांना मेडिकल हेल्प ऑपरेशन्स वैगरे चा फायदा लवकरात लवकर मिळवून दिल्या जातो ह्याचे समाधान  आहे ।
धन्यवाद!