९ मे २०१६ “सारा”ने केली पोलिसांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय

दिनांक ९ मे  २०१६ रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ठाण्यातील अव्वल नंबर ची संस्था “सारा फौंडेशन” ने ह्या वर्षातला एक सामाजिक उपक्रम राबविला. संस्थेच्या च्या वतीने यंदा ठाणे नगर पोलिस स्टेशन, काही सोसायटी. तसेच  सर्व ट्रॅफिक विभाग ऑफिसेस येथे सर्व ट्रॅफिक पोलिस कर्मचारी वर्गासाठी  गार पिण्याच्या पाण्याची विशेष सोय म्हणून ७० लिटर चे रांजण भेट देण्यात आले .
ट्राफिक पोलिस  कर्मचारी जनतेची अहोरात्र उन्हातान्हात सेवा करतात, त्यांच्या साठी हि खास सोय संस्थे तर्फे करण्यात आली. सोबत पिण्याचे पाणी त्या दिवशी भरून देण्यात आले. सर्व पोलिस कर्मचारी वर्गातून  ह्या उपक्रमाचे स्वागत केल्या गेले.
संस्थेकडून भविष्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  ठाणे जिल्हा ग्रामीण व शहर तसेच मुंबई येथे सुद्धा संस्थे तर्फे हा उपक्रम राबविला जाईल. सारा फौंडेशन हि संस्था हा उपक्रम एक पोलिस मित्र म्हणून करीत असते. विशेष सहकार्य, कार्याध्यक्ष योगेश पिंगळे,  आयोजन सारा चे सर्व सदस्यांनी मिळून केले होते.
धन्यवाद
अध्यक्षा
सारंगीताई प्रवीण महाजन