“मन प्रश्न – एक लेख”

उच्च न्यायालय म्हणतेय बायकोने सीते सारखे वागावे आजचा उच्च न्यायालयाचा निर्णय पेपर मध्ये वाचला … मी न्यायालयाच्या निर्णयाशी पूर्णपणे सहमत आहे पण ….”बायको सीतेसारखी मग नवऱ्याचे काय” ..? हि चर्चा आज नुकतीच झी चोवीस तास वर पहिली काही जणांची मते न पटणारी होती रामायण पूर्णपणे न समजून काहीही विधाने करणारी आजची चर्चा होती अश्या चर्चांमधून आजच्या नवीन पिढीला रामायणाविषयी चा काय आदर्श राहील ह्याची कल्पना पण करवत नाही आपणच आपल्या नवीन पिढीला आपल्या देवतांविषयी चुकीचे सांगत आहोत असे नाही का वाटत ….

राम हा आदर्शवादी अयोध्येचा राजा होता..आणि राज्यकर्ता कसा असावा हा आदर्श रामाने त्याच्या राज्य समोर ठेवला होता जनतेचा रोष राजावर येऊ नये म्हणून त्यावेळच्या समाजातील जनतेसाठी रामाने सीतेचा त्याग केला होता ..आजचे राज्यकर्ते रामासारखे आहेत काय हा हि एक मोठा प्रश्नच आहे …आजचे राज्यकर्ते, आजच्या बदलत्या समाजाला अनुरूप आहेत …पण सात्विक सत्वशील सीतेला रामा नी टाकले नसून जनतेसाठी तिचा त्याग केला होता पण रामाने दुसरे लग्न किवा लिव्ह इन रिलेशन शिप सारखे उपाय केले नव्हते सीता हि नेहेमी रामाच्या हृदयात होती सितेविषयीरामाच्या हृदयात अत्यंत प्रेम होते राम कधी हि सीतेला विसरला नाही आणि म्हणूनच अश्वमेघ यज्ञाच्या वेळेला रामाने सीतेचा पुतळा आपल्या बाजूला ठेवून यज्ञ संपन्न केला होता आणि सीतेने सुद्धा जनतेच्या दरबारात येऊन जनतेच्या मनातला किंतु परंतु स्वतः सत्व परीक्षा देऊन दूर केला होता आजच्या स्त्रिया अशी सत्व परीक्षा देऊ शकतील काय ???खरे तर आज न्यायालयाने आजच्या २१ साव्या शतकातल्या स्त्रियांना सीतेसारख्या महान देवीचा दर्जा दिला आहे ,पण आज त्या दर्जेला आजची स्त्री पात्र आहे काय ..??आणि आजच्या युगामध्ये राम कोण आहे हे पण शोधावेच लागेल ना.
आज आपण हिंदू धर्मातल्या देवतांची तुलना आजच्या काळातल्या जनतेशी करून चर्चा घडवून देवतांचा अपमानच करत आहोत असे नाही का वाटत ????