
सारा ट्रस्ट कडून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त वैद्यकीय मदतीच्या प्रयत्नाला यश …..
गेले 4 ते 5 दिवस माझ्या परिचयातील एका अझीम नावाच्या मुलाचे वडील हमीद सय्यद वय वर्ष 60 यांची प्रकृती बरी नव्हती त्यांना हार्ट चा त्रास होता कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात त्यांचे केस पेपर काढून त्यांच्या सर्व टेस्ट झाल्या त्यानंतर त्यांना 2D Eco टेस्ट सांगितली त्या टेस्ट साठी तारीख 3एप्रिल दिल्या गेली
माझ्या ओळखीने 8 दिवसाची तारीख करून देणार म्हणाले पण पेशंट हमीद सय्यद यांना रोज रात्री श्वासोश्वासाचा त्रास होत असल्यामुळे ऑक्सिजन लावावा लागत असे म्हणू न मी सरकारी परिचयातील Dr तडवी यांचेशी स्वतः संपर्क केला त्या वेळेस त्यांनी सांगितले की ठाणे सिव्हिल हॉस्पिटल ला ही टेस्ट होत नाही आणि कळवा येथे सरकारी रुग्णालयात फार पेशंट चा over लोड असल्या कारणाने तुम्ही ठाणे मधील नवीनच महावीर जैन चॅरिटेबल ट्रस्ट चे हॉस्पिटल उघडलेय तेथे रास्त दरात ह्यांची टेस्ट होऊ शकते ।
Dr तडवी यांनी सांगितल्या प्रमाणे दुसरे दिवशी पेशंट हमीद सय्यद यांच्या मुलगा अझीम याला मी फोन करून सांगितले
त्या वर तो वडिलांना जैन हॉस्पिटलला टेस्ट करवून घेण्यास तयार झाला
अझीम ला घेऊन मी जैन हॉस्पिटल ला गेले आणि स्वागत कक्षात आम्ही नंबर लागण्याची वाट पाहत बसलो असताना अचानक
अझीम ने मला प्रश्न केला की
मॅडम यह हॉस्पिटल मे मुस्लिम लोगोंको ऍडमिट कारवा लेते है क्या ?
मी एक सेकंद स्तब्ध झाले कारण हे माझ्या ध्यानी मनी सुद्धा नव्हते मी स्वतः एक माणुसकी च्या नात्याने 2 दिवस मदत म्हणून त्यांच्या सोबत होते
अझीम ला एकच सांगितले की जैन हॉस्पिटल जरी असले तरी पेशंट कोणत्याही धर्माचा असो इलाज हा केल्या जातो त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही त्या नंतर रु भरून 2D Eco टेस्ट करवून घेतली । काही औषधें अल्पदरात तीथूनच त्याच दिवशी रात्री जाऊन अझीम घेऊन आला।
आणि आज ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटल मधून मेडिसिन विभागातून काही औषध मी स्वतः जाऊन मिळवून दिली आज हमीद भाई यांच्या प्रकृतीत सुधारणा हळू हळू होतेय(पेशंट आर्थिक परिस्थितीने अत्यंत सामान्य आहे त्यामुळे रु ची जुळवाजुळव करण्यास पण 1 दिवस गेला)
सारा फाउंडेशन च्या माध्यमातून इतरांना मेडिकल हेल्प मिळवून देण्यात जे समाधान मला मिळाले ते मी व्यक्त करूच शकत नाही
माझ्या परिचयातील सर्व सरकारी मेडिकल क्षेत्रातील डॉक्टर्स अधीकारी वर्ग खूप छान मान सन्मानाने माझ्या सोबत असतात
आणि मोलाची मदत करतात ।हे खूप मोठे काम आहे ।
आज मलाच खूप आनंद झाला एका हार्ट पेशंट ला मोकळा स्वास घेण्यासाठी सारा ची मदत कामी आली
सारा च्या माध्यमातून अश्या बरीच लोकांना मेडिकल हेल्प ऑपरेशन्स वैगरे चा फायदा लवकरात लवकर मिळवून दिला ह्याचे समाधान मनात कायम आहे ।
धन्यवाद!