३१ जुलै २०१६ “सारा” तर्फे एक दिवसीय मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर एक सामाजिक उपक्रम

सारा फाउंडेशन ह्या सामाजिक संस्थे तर्फे ३१ जुलै २०१६ रोजी डोळ्याची मोफत मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया एक दिवसाचे शिबीर लावण्यात आले.हे शिबीर ठाणे येथील महानग पालिकेची ६४ नंबरच्या शाळेत घेण्यात आले . भर पावसातही नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला एकूण २२३ गरजू रुग्णांनी मोतीबिंदू या शिबिराचा लाभ घेतला एकूण १७ रुग्णांना मोतीबिंदू आहे असे जाणवताच त्यांना संस्थे तर्फे डॉक्टर हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट च्या रुग्णालयात पाठविण्यात आले आणि त्यांची शस्त्र क्रिया जेवण प्रवास व राहणे अशी सर्व व्यवस्था मोफत करण्यात आली . संस्थेच्या ह्या शिबिरासाठी
कार्यक्रम यशस्वी करण्या साठी विशेष सहकार्य : – शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लता शिर्के ,सारा संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पिंगळे ,संगीता जैन ,विजय जैन ,सुजाता सांडभोर ,प्रदीप येरापल्ले गणेश येरपल्ले , जयश्री पोटघन , कामाक्षी वाघुळदे,सचिन ठाणेकर तसेच छत्रपती प्रतिष्ठान ,ठाणेकर स्पोर्ट्स युवा संस्था रोटरी क्लब लक्ष्मी च्यारिटेबल ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले
धन्यवाद !

अध्यक्ष
सारंगीताई प्रवीण महाजन